कासारवाडीत उल्लेखनिय कामगिरीकरिता महिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासारवाडीत उल्लेखनिय कामगिरीकरिता महिलांचा सन्मान
कासारवाडीत उल्लेखनिय कामगिरीकरिता महिलांचा सन्मान

कासारवाडीत उल्लेखनिय कामगिरीकरिता महिलांचा सन्मान

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १७ ः कासारवाडी येथील कै. भीमराव महादू जवळकर विकास संस्थेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून समर्थ महिला उद्‍देशीय संस्थेच्या संस्थापिका राजश्री गागरे उपस्थित होत्या. सरस्वती प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महिलांसाठी मनोरंजक खेळ, रॅम्प वॉक, गेम्स शो, गाणी, गप्पा गोष्टी, उखाणे यांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी विविध स्पर्धेचा मनसोक्त आनंद घेतला. तसेच स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. कासारवाडी परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४० महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन प्रतिभा रघुनाथ जवळकर यांनी केले. यावेळी प्रतिभा जवळकर म्हणाल्या, ‘‘महिला दररोज आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त असतात कधीतरी त्यांना थोडा विरंगुळा मिळावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.’’ यावेळी पिंपरी-चिंचवड भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश तात्या जवळकर, राहुल जवळकर, शंकर दळवी, शशिकांत जवळकर, रवींद्र जवळकर, प्रतीक कदम, अनिल वायंदडे, रवींद्र जगदाळे, वैशाली जवळकर, स्नेहल दराडे, तृप्ती जवळकर, मोनिका कर्नावट, ममता कांबळे, आरती सोनावणे, पूजा डिसिल्वा उपस्थित होते.