Tue, May 30, 2023

धम्मचक्र प्रवर्तन महाविहार शिबिर उत्साहात
धम्मचक्र प्रवर्तन महाविहार शिबिर उत्साहात
Published on : 20 March 2023, 6:57 am
जुनी सांगवी, ता. २० ः दापोडी येथे एकदिवसीय धम्म शिबिर घेण्यात आले. धम्मचक्र प्रवर्तन महाविहार या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एक दिवसीय शिबिरात धम्मचारी मैत्रेयबोधी यांनी ‘मुक्ती कोण पथे’ या विषयावर प्रवचन दिले. धम्मचारीनी यशोतमा यांनी सूत्रसंचालन केले.आभार शाक्यधर यांनी मानले. धम्मचारीनी मैत्रिरत्ना यांच्यासह १२६ लोक उपस्थित होते. अन्नदान सुनील नितनवरे यांनी दिले.