Sun, May 28, 2023

रहाटणीतील अनंत मठात
स्वामी प्रकट दिन सोहळा
रहाटणीतील अनंत मठात स्वामी प्रकट दिन सोहळा
Published on : 22 March 2023, 9:19 am
रहाटणी, ता. २२ : स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त गुरुवारी (ता. २३) शिवराज नगर येथील अनंत मठात रक्तदान शिबिर व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमांस पहाटे पाच वाजता काकड आरती पासून सुरवात होणार आहे. त्यानंतर अभिषेक, श्री दत्त याग, दहिभाते महाराज यांचे प्रवचन, महाराजांची आरती, तसेच सायंकाळी पाच ते साडेसहाच्या दरम्यान संभाजीनगर येथील कृष्णाई भजनी मंडळ भजनाचा कार्यक्रम व रात्री श्रींची पालखी व दहा वाजता विडा व शेज आरती केली जाणार आहे. कार्यक्रम गुरूमाऊली सुनीता अनंत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्याच्या विविध भागातील व देश विदेशातून भक्त गण येत असतात. अशी माहिती प्राध्यापक अभिजित पंडित यांनी दिली.