गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

पीएमआरडीएच्या अभियंत्याला जिवे मारण्याची धमकी
पिंपरी : पुणे महानगर प्रदेशविकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्य अभियंत्याला त्यांच्या दालनात शिरून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. रामचंद्र जगताप (वय ४५) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अशोक मारूतीराव भालकर (वय ५५, रा. भोसलेनगर, शिवाजीनगर) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे आकुर्डी येथील पीएमारडीएच्या कार्यालयात मुख्य अभियंता या पदावर कार्यरत असून त्यांच्या दालनात बैठक सुरू होती. दरम्यान, मुख्य ठेकेदार कुणाल भोसले यांच्या सोबत आलेला आरोपी रामचंद्र हा परवानगीविना दालनात शिरला. भालकर यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. ‘तुम्हाला बघून घेतो’, असा दम देत आरडाओरडा करून गोंधळ घातला व सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
----

स्कूलबस चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
स्कुलबस चालकाने रस्त्यात बस थांबवून बसमधील मुलीला आडबाजूला नेत अत्याचार केला. हा प्रकार चऱ्होली येथे घडला. स्कूल बसचालक प्रशांत आंत्रे (वय ३४, रा. थोरवे वस्ती, चऱ्होली फाटा) याला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या आजीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेची नात स्कूल बसने शाळेत जाते. आरोपी प्रशांत याने चऱ्होली येथे स्कूल बस थांबविली. मुलीला एकटीलाच बसमधून खाली उतरवले. तिला चालत आडबाजूला खड्यात घेऊन गेला. व तिच्यावर अत्याचार केला.

-------

आईकडून मुलीला मारहाण
आईने मुलीला लाटण्याने मारहाण केल्याची घटना वाकड येथे घडली. याप्रकरणी मुलीच्या आईवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोप महिलेच्या दोन मुली घरात भांडण करीत होत्या. आरडाओरडा करीत असल्याने महिलेने चिडून लाटण्याने छोट्या मुलीला मारहाण केली. यामध्ये सतरा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
------
तरुणीचा विनयभंग करून आईला मारहाण
तरुणीचा विनयभंग करून तिच्या आईला बेदम मारहाण केल्याची घटना चिंचवड मधील नागसेननगर येथे घडली. याप्रकरणी जाकीर सय्यद (रा. बिजलीनगर झोपडपट्टी, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीचा पाठलाग केला. तिच्याशी गैरवर्तन करीत विनयभंग केला. यास तरुणीने विरोध केला असता आरोपीने तिला ढकलून दिले. फिर्यादीच्या आई तेथे आल्या असता त्यांनाही हाताने व लाथाने मारहाण केली.
--------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com