श्री राम प्रतिमा मिरवणुकीत 
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

श्री राम प्रतिमा मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपळे सौदागर, ता. २५ : संस्कृती संवर्धन मंचच्या वतीने ढोलताशांच्या गजरात प्रभू श्री राम प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. जिजामाता उद्यान - पी.के. चौक - विश्वशांती कॉलनी - पोलिस चौकी - हनुमान मंदिर - अण्णासाहेब मगर स्कूल - गोविंद चौक - साई मंदिर - कुंजीर मैदान अशा मार्गाने काढलेल्या मिरवणुकीत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लेझीमचा ठेका धरून समाजात एकात्मतेचा संदेश दिला.
या मिरवणुकीत वारकरी, सत्यभामा, ज्ञानाई, विठ्ठल रुक्मिणी, गुरू माऊली महिला मंडळांचा समावेश होता. तसेच नवचैतन्य हास्य क्‍लब, विविध विकास समित्यांच्या सदस्यांनी सहभाग घेतला. पी.के. स्कूलच्या बॅण्ड पथकाने यात्रेत रंगत आणली. पथनाट्य समुहातून सामाजिक संदेश दिला. टॅलेंट फॉर नेशन फाउंडेशन, लायन्स क्‍लब, आर्ट ऑफ लिव्हिंग, योग विद्याधाम, इस्कॉन, कलावती देवी उपासना केंद्र, गायत्री परिवार, जगद्गुरू कृपाळू महाराज परिषद, एक मुठ्ठी अनाज, शिवतेज कबड्डी मंडळ, लाड शाखीय वाणी समाज, संघ परिवार आणि पिंपळे सौदागर येथील रहिवाशांनी या निवडणुकीत सहभाग घेतला.
भाजप चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे, कुंदा भिसे, विजय जगताप, नीलेश जगताप, कैलास कुंजीर, अतुल पाटील, मनोज ब्राह्मणकर, जयनाथ काटे, सोमनाथ काटे, महेंद्र झिंझुर्डे, विठ्ठल झिंजुर्डे, संजय भिसे आदींनी शोभायात्रेसाठी योगदान दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com