नववी व दहावीचे वर्ग 
आरटीईमध्ये अंतर्भूत करा

नववी व दहावीचे वर्ग आरटीईमध्ये अंतर्भूत करा

रहाटणी, ता. २५ : आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता शासन आरटीईच्या माध्यमातून आठवीपर्यंत शिक्षण मोफत देते. मात्र, पुढे नववी व दहावीची खासगी शाळांची भरमसाट फी असते, ती आरटीई योजनेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना परवडत नाही. त्यामुळे नववी व दहावी या दोन वर्गाकरिताही आरटीई योजना लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक चखाले व तुकाराम मकासरे यांनी केली आहे.
याबाबत चखाले व मकासरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनील वारे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खासगी इंग्रजी शाळेतही आठवीपर्यंत प्राथमिक शिक्षण आरटीई अंतर्गत झाले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची फी नाही. परंतु, विविध बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील नववी व दहावी या दोन वर्गांची फी या आरटीई विद्यार्थ्यांना परवडत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी शाळा सोडतात किंवा सरकारी मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात. यामध्ये या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाताहत होते. ही बाब अत्यंत गंभीर असून, तातडीने नववी आणि दहावी या दोन वर्गांना आरटीई योजना लागू करणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com