
मुळानगर झोपडपट्टीतील ड्रेनेजचा प्रश्न मार्गी
जुनी सांगवी, ता. २८ ः येथील मुळानगर झोपडपट्टीत ड्रेनेज सेवा वाहिन्या तुंबल्याने मैलामिश्रित पाणी लिकेज होत होते. यामुळे दुर्गंधी सोबतच रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या मुळे नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापालिका प्रशासनाच्या मलनिस्सारण विभागाकडून येथील दुरुस्ती तत्काळ करण्यात आली. याबाबत येथील रहिवाशांनी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्याकडे तक्रार केली होती. शितोळे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला.
‘‘नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन, येथील पाहणी करून दुरुस्ती करण्यात आली आहे. कमी पाण्याचा वापर, काही ठिकाणी पी.व्ही.सी. पाइपचा वापर, अडकलेले सिमेंट यामुळे वाहिन्यांमधून व्यवस्थित निचरा होत नव्हता. येथील दुरुस्ती करण्यात आली आहे.’’
- प्रीती यादव, अभियंता मलनिस्सारण विभाग
‘‘गेल्या काही दिवसांपासून चेंबर तुंबल्याने दुर्गंधी व इतर अडचणींचा सामना करावा लागत होता.’’
- अमित चलवादी, रहिवासी