‘शिवसृष्टी उद्यानासमोर 
पार्किंगची व्यवस्था करा’

‘शिवसृष्टी उद्यानासमोर पार्किंगची व्यवस्था करा’

जुनी सांगवी, ता. १८ ः शिवसृष्टी उद्यानासमोर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येथे उपाययोजना करून पार्किंग व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथील लक्ष्मीनगर भागातील महापालिकेच्या स्वर्गीय तानाजीराव शितोळे उद्यान (शिवसृष्टी) या उद्यानासमोर पार्किंग होऊ नये म्हणून लावण्यात आलेल्या पोलमुळे नागरिक रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग करीत असल्याने येथे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. सांगवीतील हा प्रमुख रस्ता असल्याने मुख्य रस्त्याला ये-जा करण्यासाठी, उद्यानात येण्यासाठी जयमाला नगर,अभिनव नगर, मुळा नगर, पवनानगर, शिंदेनगर आदी भागातील रहिवासी नागरिक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. पोल काढून टाकल्यास उद्यानाबाहेरील मोकळ्या परिसरात पार्किंगची व्यवस्था झाल्यास रस्त्यावर पार्किंग होणार नाही. परिणामी रहदारीच्या रस्त्यावर पार्किंग येणार नाही. येथील पार्किंग बाबत तत्काळ उपाययोजना करावी. वाहतूक कोंडी व पार्कींगमुळे उद्यानात येणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आदींना अपघाताचा धोका संभवतो. ही बाब लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे स्थापत्य उद्यान विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com