दिघीमधील तरुणीची 
दीड लाखांची फसवणूक

दिघीमधील तरुणीची दीड लाखांची फसवणूक

पिंपरी, ता. २६ : ऑनलाइन नोकरी शोधत असताना आलेल्या एका लिंकवर आर्थिक गुंतवणुकीत जास्त नफ्याचे आमिष दाखवून, तरुणीची दीड लाखांची फसवणूक केली. हा प्रकार दिघी येथे घडला.
याप्रकरणी २० वर्षीय तरुणीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरुणी घरी असताना तिने ऑनलाइन माध्यमातून नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांना आलेल्या लिंकवर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत अधिक नफा होईल, असे त्यात आमिष दाखवले. आरोपींनी फिर्यादी तरुणीचा विश्वास संपादन करून तिला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तरुणीने एक लाख ५९ हजार रुपये गुंतवले. मात्र, तरुणीला कोणताही नफा अथवा गुंतवलेली रक्कम मिळाली नाही.

--------

कठड्याला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू
दुचाकी घेऊन जात असताना कठड्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपळे निलख येथे घडली. रवींद्र सुकदेव ठाकरे (वय ३२, रा. रावेत) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ठाकरे हे त्यांच्या दुचाकीवरून बीआरटी रोडने जात असताना पिंपळे निलख येथे दुचाकीची रस्त्याच्या कठड्याला धडक बसली. त्यात ठाकरे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
------------------------

तरुणीसोबत साखरपुडा करून फसवणूक

पिंपरी ः तरुणीसोबत साखरपुडा करून तिच्यावर अत्याचार केला. शेअर मार्केटसाठी घेतलेले पैसे
फेडण्यासाठी तरुणीला कर्ज काढण्यास भाग पाडले. त्यानंतर तरुणीकडून सव्वापाच लाख रुपये घेऊन तिच्याशी भांडण करत लग्न करण्यास नकार दिला.
याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुण्यातील तरुणासह त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी तरुणीसोबत एप्रिल २०२२ मध्ये साखरपुडा केला. त्यांनतर तरुणीला महाबळेश्वरसह ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. आरोपीच्या वडिलांनी तरुणीचा विश्वास संपादन करून, शेअर मार्केटसाठी घेतलेले पैसे फेडण्यासाठी तरुणीला कर्ज काढण्यास भाग पाडले. तरुणीकडून आरोपींनी ५ लाख २२ हजार रुपये घेऊन ते परत न देता फसवणूक केली. तसेच, तरुणीवर संशय घेऊन तिच्याशी लग्न करणे टाळले. पैसे मागण्यास आल्यास तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी देत शिवीगाळ केली. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com