जुनी सांगवीत रविवारी नातवंडांचे स्नेहसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुनी सांगवीत रविवारी नातवंडांचे स्नेहसंमेलन
जुनी सांगवीत रविवारी नातवंडांचे स्नेहसंमेलन

जुनी सांगवीत रविवारी नातवंडांचे स्नेहसंमेलन

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १० ः जुनी सांगवी येथे अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नातवंडांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
नातवंडांना आता उन्हाळ्याची सुटी लागली आहे. सुटी कालावधीत किंवा इतर वेळीही, मुलांनी काही छंद जोपासावा म्हणून पालक विविध कला कौशल्यांचे क्लास लावतात. नातवंडं शिकतात, तयार होतात मात्र, त्यांनी सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळणं आवश्यक असते. याची उणीव लक्षात घेऊन अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रविवार (ता. १४) मे रोजी संध्याकाळी पाच वाजता अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक सभागृहात नातवंडांचे स्नेहसंमेलन आयोजित केले आहे. यात नृत्य करणे, गीत गायन, अभिनय, अभिनयासह कविता, राष्ट्रभक्ती गीत, भारूड, भक्तिगीत सादरीकरण, तबला, संवादिनी, बासरी, गिटार आदी वाद्य वादन, नकला, अशा बहुअंगी कलांचे सादरीकरण करण्यासाठी या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे. यात पाच ते बारा वर्षं व तेरा ते वीस वर्ष वयोगट असे दोन विभाग करण्यात आले आहेत. मोफत निःशुल्क आयोजनासोबतच यातील सहभागी नातवंडांना बक्षिसे तसेच खाऊ वाटप करण्यात येणार आहे.

‘‘सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात असे कार्यक्रम होत नाहीत नातवंडांना आकर्षक व्यासपीठावर आपली कला सादर करता येईल. त्यांचा धीटपणा, आत्मविश्वास वाढेल. आजी-आजोबांना या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. आजोबा व नातू हे नाते दृढ होण्यास मदत होईल.’’
- रवींद्र निंबाळकर, अध्यक्ष अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ.