आकर्षक भिंती शिल्पातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारे शिवसृष्टी उद्यान

आकर्षक भिंती शिल्पातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारे शिवसृष्टी उद्यान

बालगोपालांची पसंती
जुनी सांगवीतील शिवसृष्टी

मुळा-पवना नदी संगमावर वसलेले जुनी सांगवी. गाव ते उपनगर अशी वाटचाल. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांना मध्यवर्ती ठिकाण. गावातील लक्ष्मीनगर येथे महापालिकेने तानाजीराव शितोळे सरकार उद्यान उभारले असून त्यात शिवसृष्टी साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा बालपणापासूनचा इतिहास म्युरल्सद्वारे मांडला आहे. उद्यानाचा परिसर सुमारे दोन एकरांचा आहे. दुमजली ध्यानधारणा केंद्र, सभागृह, बालचमूंसाठी खेळणी, व्यायामासाठी ओपन जीम, हिरवळ, विविध फुलझाडे, गोलाकार विविध झाडे आहेत. यामुळे बाळगोपाळांसह ज्येष्ठांच्या पसंतीचे ठिकाण आहे. शिवसृष्टी उभारताना इतिहासाचे गाढे अभ्यासक निनाद बेडेकर, शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे यांचे विशेष सहाय्य लाभले आहे. म्युरल्ससाठी उमेश ठाकर व किमया आर्किटेक्टचे अनुप सातपुते यांचे सहाय्य मिळाले आहे.
- रमेश मोरे

म्युरल्समध्ये काय
‘दार उघड बया’ म्हणणारे संत एकनाथ महाराज, जिजाऊ मॉं साहेबांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य, शिवजन्म, जिजाऊंचे संस्कार, शिवरायांचे खेळ, शिवरायांचे प्रशिक्षण, सोन्याचा नांगर, कसबा गणपती पुनर्प्रतिष्ठापना, स्वराज्य शिदोरी, शिवरायांची सवंगड्यासोबत कांदा भाकरी, संत शिरोमणी तुकाराम महाराज कीर्तन, शिवरायांची मावळ्यांसह स्वराज्याची शपथ, स्वराज्याचे तोरण, रांझ्याचा पाटील, शिवरायांची पितृभक्ती, एलिफंटा केव्हज्, शिवरायांचे आरमार, प्रतापगड निवासिनी भवानीमाता, घोड्यांच्या पागा, अफजलखानाचा वध, शाहीर अज्ञानदास, पावनखिंड वीर बाजीप्रभू देशपांडे, लालमहाल शाहिस्तेखानाची फजिती, राजमाता जिजाऊंची सुवर्णतुला, आग्रा दरबार, आग्र्याहून सुटका, छत्रसाल बुंदेला, वीर तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, नेताजी पालकरांचे शुद्धीकरण, श्रीशैल मल्लिकार्जुन, शिवभूषण आदी प्रसंग आहेत. जागोजागी मेघडंबरी, दगडी बांधकाम आहे. यामुळे उद्यानाची पारंपरिक शिवकालीन बांधकामाची ओळख प्रतिबिंबित होते. शिवाजी महाराजांचा सचित्र इतिहास समजून घेण्यासाठी अनेक जण उद्यानात येतात. प्रत्येक शिल्पाखाली त्या-त्या प्रसंगाची माहिती दिली आहे.

उद्यानाची रचना
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास म्युरल्सद्वारे साकारला
- दगडी चिरेबंदी गड कोटांची प्रतिकृती असलेले प्रवेशद्वार
- प्रवेशद्वारासमोर स्वागताला हत्तींच्या आकर्षक प्रतिकृती
- मशाल हाती घेवून पहारा देणाऱ्या मावळ्यांच्या प्रतिकृती
- हत्तींच्या प्रतिकृती असल्याने हत्ती गार्डन अशी ओळख

जायचे कसे?
- पुण्यातून औंध मार्गे जुनी सांगवीत जाता येते
- पुणे-मुंबई महामार्गाने बोपोडी व दापोडीतून मार्ग
- नाशिक फाटा येथून पिंपळे गुरव, नवी सांगवी मार्गे
- वाकड, हिंजवडी, रावेत परिसरातून सांगवी फाटा मार्गे
- पिंपळे सौदागर व पिंपरीतून पिंपळे गुरव, नवी सांगवी मार्गे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com