Sun, Sept 24, 2023

कर्नाटकमध्ये भाजपला
चोख उत्तर ः गव्हाणे
कर्नाटकमध्ये भाजपला चोख उत्तर ः गव्हाणे
Published on : 14 May 2023, 2:30 am
पिंपरी, ता. १४ : महागाई, भ्रष्टाचार आणि जातीय राजकारणाला कंटाळलेल्या कर्नाटकमधील जनतेने भाजपला विधानसभा निवडणुकीत चोख उत्तर दिले आहे. ‘भाजप हटाव, देश बचाव’ला कर्नाटकमधून प्रारंभ झाल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात गव्हाणे यांनी म्हटले आहे, की देशातील लोकांचा ‘मूड’ बदलत आहे. मोदी सरकारवर जनतेचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे देशात मोदी सरकारविरोधात जनमत तयार होत आहे. याचा प्रत्यय कर्नाटक विधानसभा निकालातून आला आहे. तसेच आगामी लोकसभा आणि राज्यातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनताही भाजपला धडा शिकविणार असल्याचेही गव्हाणे यांनी निवेदनात म्हटले आहे.