थेरगावात आगीत कारखाना खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थेरगावात आगीत 
कारखाना खाक
थेरगावात आगीत कारखाना खाक

थेरगावात आगीत कारखाना खाक

sakal_logo
By

काळेवाडी, ता. १४ : दुकानाचे बोर्ड बनविणाऱ्या कारखान्याला आग लागल्याने कारखाना जळून खाक झाला. ही घटना थेरगाव फाटा येथे रविवारी (ता. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
थेरगाव फाटा येथे डिजिटल बोर्ड व लेझर कटींगचे काम करणाऱ्या कारखान्याला आग लागल्याची वर्दी अग्नीशमक दलाला मिळाली. त्यानंतर थेरगाव, रहाटणी व मुख्य अग्नीशमक केंद्रातील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्या तासात आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत या कारखान्यातील साहित्य व यंत्र जळून खाक झाले. दरम्यान, आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
थेरगाव ‘ग’ क्षेत्रिय कार्यालय अग्नीशमक केंद्रापासून घटनास्थळी पोचण्यास सुमारे पाच मिनिटे वेळ लागणे अपेक्षित आहे. मात्र, २० मिनिटांनंतर अग्नीशमक बंब घटनास्थळी दाखल झाले. याबाबत कारखान्याचे मालक महादेव सुरवसे यांनी सांगितले की, मी १०१ क्रमांकावर संपर्क साधत होतो. मात्र, संपर्क होत नव्हता.