‘नवी सांगवीतील रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नवी सांगवीतील रस्त्याचे
काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा’
‘नवी सांगवीतील रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा’

‘नवी सांगवीतील रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा’

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १६ ः येथील नवी सांगवीला जोडणाऱ्या बा. रा. घोलप महाविद्यालय कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या एक किलोमीटर रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. सद्यःस्थितीत येथील रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित अडीच मीटर पदपथाचे काम करण्यात येणार असल्याचे स्थापत्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. रहदारीचा हा प्रमुख रस्ता असल्याने पावसाळ्या आधी हे काम पूर्ण करण्यात यावे, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
पर्यायी रस्ता व धुळीचा त्रास-प्रमुख रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी सांगवी फाटा शनी मंदिर फेमस चौक येथून साईचौक मार्ग अशा एकेरी वाहतुकीची रचना करण्यात आली होती. सध्या एका बाजूचा रस्ता पूर्ण झाला असला तरी उर्वरित कामामुळे तो खुला करण्यात आला नसल्याने वाहनचालक पर्यायी रस्ता असून देखील रस्त्याच्या दुसऱ्या मोकळ्या जागेतून वाहने दामटताना दिसतात. खड्डे, धुळीतून रहदारी होत असल्याने येथे अपघाताचा संभाव्य धोका नाकारता येत नाही. काम सुरू असल्याने तयार सिमेंट रस्त्यावरून रहदारी होवू नये यासाठी स्थापत्य विभागाकडून येथे बॅरिकेड्स, सिमेंट पाइप आडवे लावून रस्ता बंद केला असला तरी अतिउत्साही दुचाकीस्वार यावर रहदारी करताना पाहायला मिळतात. स्थापत्य विभागाशी संपर्क साधला असता
येथील उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे स्थापत्य विभागाचे ह प्रभाग स्थापत्य अभियंता अनिल शिंदे यांनी सांगितले.