
स्पायसर रस्त्यावर वाढताहेत कचऱ्याचे ढीग
जुनी सांगवी, ता. १८ ः मुळा नदीने पिंपरी चिंचवड व पुणे शहर जोडले गेलेले आहे. या हद्दीवर म्हणजेच औंध स्पायसर रस्त्यावर चाकरमानी मंडळी कामाला येताना-जाताना रस्त्याच्याकडेला कचरा भिरकावत आहेत. दिवसेंदिवस या कचऱ्यांचे ढीग वाढत आहे. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरत आहे. तसेच, दोन्ही हद्दीतील आरोग्य विभागाकडून येथील नियमित कचरा संकलन करून स्वच्छता करण्यात येत आहे. मात्र, कामाला जाताना व वेळेअभावी चाकरमानी मंडळी घरातून कचरा घेऊन बाहेर पडतात. व रस्त्याकडेला कचरा भिरकावतात परिणामी या ठिकाणी पुन्हा कचऱ्याचा ढीग लागतो. यावर ठोस उपाययोजना करावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
‘‘अनेकदा पूजेचे साहित्य नदी पुलावर संरक्षक जाळी लावलेली असून सुद्धा असे निर्माल्य भिरकावले जाते. तसेच, स्वागत फलकाजवळच कचरा टाकला जात आहे.’’
- रंजना मोरे, अध्यक्ष मातृभूमी महिला बचत गट.
‘‘पिंपरी चिंचवड शहर हद्दीपर्यंत नियमित स्वच्छता करण्यात येतो. औंध विभागाकडून पलिकडे कचरा उचलला जातो.’’
- दीपक कोटीयाना, आरोग्य निरीक्षक सांगवी विभाग.