
राजेंद्र जगताप यांच्या पाठपुराव्यानंतर पिंपळे गुरवमधील अंतर्गत रस्त्याच्या कामांना सुरुवात -
अंतर्गत रस्त्याच्या कामांना अखेर ‘मुहूर्त’
पिंपळे गुरवमधील नागरिकांना दिलासा ः पावसाचे पाणी वाहून जाणार
जुनी सांगवी, ता. २० ः पिंपळे गुरवमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत मुख्य रस्त्यांची कामे झाली. मात्र, अंतर्गत रस्त्यांची कामे रखडलेली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत अंतर्गत रस्त्याची कामे सुरू करण्यात आली आहेत.
पिंपळे गुरव - नवी सांगवी परिसरातील अनेक समस्या ‘जैसे थे’ असल्याबाबत राजेंद्र जगताप यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत पवार यांनी महापालिका आयुक्तांना रखडलेल्या कामांकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्यानुसार पिंपळे गुरवमधील अमृता कॉलनी, भीमाशंकर कॉलनीच्या दोन गल्ल्या, गणेशनगरमधील अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. या गल्ल्यांमध्ये पावसाळी पाणी वाहून जाण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे पाणी रस्त्यावर साठून राहत होते. अवकाळी पावसामुळेही या ठिकाणी पाणी रस्त्यावर साठून राहिले होते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. आता काम सुरू झाल्याने नागरिकांना येणाऱ्या पावसाळ्यात समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील कामे रखडलेल्या अवस्थेत होती. नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत होती. जलनि:स्सारण वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी कुठेही पाणी साचून राहणार नाही. रस्त्यालगत नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची समस्या यामुळे सुटण्यास मदत होणार आहे.
कोट-
‘‘गेल्या अनेक दिवसांपासून येथील कामे रखडली होती. आता पावसाळी गटारांची कामे पूर्ण करून अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरवात झाल्याने नागरिकांची समस्यांतून सुटका होणार आहे.
-राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस
पिंपळे गुरव ः अमृता कॉलनी व इतर गल्ल्यांमधील रखडलेल्या रस्ते कामाची महापालिका प्रशासनाकडून सुरवात करण्यात आली आहे.
फोटोः 15514, 15515