अप्रमाणबद्ध गतिरोधक रहदारीस त्रासदायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अप्रमाणबद्ध गतिरोधक 
रहदारीस त्रासदायक
अप्रमाणबद्ध गतिरोधक रहदारीस त्रासदायक

अप्रमाणबद्ध गतिरोधक रहदारीस त्रासदायक

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १९ ः जुनी सांगवी, नवी सांगवी परिसरातील अप्रमाणबद्ध गतिरोधक रहदारीस त्रासदायक ठरत आहेत. उंच व मोठ्या रुंदीच्या अप्रमाणबद्ध गतिरोधकामुळे वाहने आदळून ज्येष्ठ नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपघात होवू नयेत, वेग कमी राहावा, रहदारी सुरक्षित व्हावी म्हणून केलेले गतिरोधक याउलट आजारापेक्षा उपचार भयंकर या उक्तीप्रमाणे गतिरोधक रहदारीस धोकादायक व त्रासदायक ठरत आहेत.
यामुळे ज्येष्ठांना मणके विकार, कंबरदुखी सारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. रॅमलर पद्धतीचे प्रमाणबद्ध गतिरोधक सांगवी, नवी सांगवी, दापोडी परिसरात नव्याने करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

‘‘प्रमाणबद्ध गतिरोधक असणे आवश्यक आहे. यामुळे ज्येष्ठांना त्रास होणार नाही.’’
- बबन शितोळे, ज्येष्ठ नागरिक, जुनी सांगवी

‘‘सांगवी, नवी सांगवी परिसरातील बहुतांश जुने मोठे गतिरोधक काढण्यात आलेले आहेत. स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत पिंपळे गुरव, नवी सांगवी भागात वाहतूक परिवहन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रॅमलर लावण्यात आलेले आहेत. काही ठिकाणचे राहिले असल्यास स्थापत्य विभाग अभियंता व परिवहन विभागाच्या संयुक्त परवानगीने नव्याने गतिरोधक करण्यात येतील.’’
- सुनील दांगडे, अभियंता स्थापत्य विभाग