सांगवी फाटा ते पोलिस चौकी
रस्त्याचे युद्धपातळीवर काम सुरू

सांगवी फाटा ते पोलिस चौकी रस्त्याचे युद्धपातळीवर काम सुरू

जुनी सांगवी, ता. २९ ः सांगवी फाट्याकडे जाणाऱ्या सांगवी पोलिस चौकीसमोरील चौक रस्त्याचे स्थापत्य विभागाकडून काम सुरू करण्यात आले आहे. या पुढील नवी सांगवी फाटा चौक सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम किरकोळ कामे वगळता पूर्ण झाले असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
सध्या चौकाचे काम सुरू असल्याने येथे रहदारीसाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. जुनी सांगवी, नवी सांगवी पिंपळे गुरवला जोडणारा सांगवी फाट्याकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी होती. सद्यपरिस्थितीत या रस्त्याचे अर्धे काम पूर्ण करण्यात आले आहे. जुनी सांगवी पोलिस चौकी चौक ते घोलप महाविद्यालय कॉर्नर सिमेंट कॉंक्रिटीकरण असे कामाचे स्वरूप आहे. सध्या अर्ध्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने या रस्त्यावरून रहदारी सुरू करण्यात आली आहे. सध्या चौकाचे काम सुरू असल्याने वाहनचालक नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करत कोंडी टाळून सहकार्य करावे, असे आवाहन स्थापत्य विभागाकडून करण्यात आले आहे.मुख्य चौक असल्याने या चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते.

‘‘खोदकामाचा राडारोडा तसेच येथील कामासाठी टाकण्यात आलेले खडी वाळूचे ढीग रस्त्यावर येणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.’’ - विशाल सांगळे, स्थानिक रहिवासी

‘‘पावसाळ्यापूर्वी येथील काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचबरोबर पावसाचा अंदाज घेऊन पुढील अर्ध्या रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेण्यात येईल.’’
- महेंद्र देवरे, अभियंता स्थापत्य विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com