भाजलेल्या रुग्णाला 
‘फॉर्च्युन’मध्ये जीवदान

भाजलेल्या रुग्णाला ‘फॉर्च्युन’मध्ये जीवदान

रहाटणी, ता. ३ : तळेगाव येथील ३५ वर्षीय तरुण घरात काम करीत असताना गॅसचा भडका होऊन, जवळपास ८५ टक्के भाजला. त्याला उपचारासाठी येथील फॉर्च्युन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ४५ दिवसांच्या अथक परिश्रमाने डॉक्टरांच्या टीमला या रुग्णाचा जीव वाचवण्यात यश मिळाले. सध्या तो रुग्ण सुखरूप घरी गेला.
डॉ. चंद्रशेखर अन्नदाते, डॉ. अतुल दायमा, डॉ. संदीप नाफाडे, डॉ. नितीन काबरा व रुग्णालयातील कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेऊन रुग्णाचे प्राण वाचवले. यासाठी रुग्णावर १० वेळा शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. हा रुग्ण पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात उपचार घेत होता. तेथे रुग्ण वाचण्याची शक्यता खूप कमी आहे, असे सांगितल्यामुळे नातेवाइकांनी रुग्णाला फॉर्च्युन हॉस्पिटल येथे हलवले. रुग्णाची पत्नी व इतर नातेवाइकांनी उपचार करत असताना खचून न जाता रुग्णाचे मनोबल वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले.
‘‘घरगुती काम करत असताना ज्वालाग्राही उपकरणे हाताळताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. जेणेकरून असे अपघात टाळणे शक्य होते, ’’ असे डॉ. अतुल दायमा व डॉ. चंद्रशेखर अन्नदाते यांनी सांगितले.

----------------
फॉर्च्युन हॉस्पिटल, रहाटणी, : भाजलेल्या रुग्णाचे डॉक्टरांनी प्राण वाचवले. यावेळी (डावीकडून) डॉ. प्रदीप जाधव, डॉ. चंद्रशेखर अन्नदाते, विकास पिंपळे, अतुल ढवळे.
फोटो ः 15634

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com