विविध दाखल्यांसाठी महा ई सेवा केंद्रांत गर्दी

विविध दाखल्यांसाठी महा ई सेवा केंद्रांत गर्दी
Published on

जुनी सांगवी, ता.२५ ः दहावी- बारावी परीक्षांच्या निकालानंतर पुढील शैक्षणिक प्रवेश महापालिका स्तरावरील व योजना, शासकीय सवलती यासाठी विविध दाखले व कागदपत्रे जमविण्यासाठी सध्या दापोडी, पिंपळे निलख, सांगवी परिसरातील महा ई - सेवा केंद्रांमधून पालक व विद्यार्थ्यांची गर्दी होताना दिसत आहे.
उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला (डोमिसाईल) नॉन क्रिमिलियर, जातीचा दाखला, आधार दुरुस्ती असे विविध दाखले व कामांसाठी पालक, विद्यार्थ्यांची महा ई सेवा केंद्रात गर्दी करत आहेत. बहुतांश दाखले डिजिटल पद्धतीने येत असल्याने त्यासाठी लागणाऱ्या संबंधित कागदपत्रांची जमवाजमव करताना पालक विद्यार्थी दिसत आहेत. तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी यांच्या कार्यालयांमधूनही गर्दी वाढू लागली आहे. जुनी सांगवी, दापोडी, पिंपळे निलख परिसरात महा ई - सेवा केंद्रामधून वर्दळ वाढली आहे.
जुनी सांगवी ‘आधारा’विना
जुनी सांगवी परिसरात आधार दुरूस्ती केंद्र नसल्याने नागरिकांची इतरत्र फरफट होत आहे. आधार कार्डावरील नाव दुरुस्ती, पत्ता दुरुस्ती, फोटो दुरुस्ती अशी कामे करण्यासाठी जुनी सांगवीकरांना पिंपळे गुरव व इतरत्र जावे लागत असल्याने सांगवीत आधार केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शाळा, महाविद्यालय प्रवेशासाठी लागणारी स्टेशनरी, वह्या पुस्तके, इतर साहित्य खरेदीसाठी स्टेशनरी दुकानांमधून खरेदीसाठी गर्दी होत आहे. मूळ प्रतींची झेरॉक्स प्रती काढण्यासाठी झेरॉक्स दुकानांवर विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्टेशनरी, झेरॉक्स दुकानांना सुगीचे दिवस आले आहेत.
जुनी सांगवीतील नागरिक रेश्मा शिंदे म्हणाल्या,‘‘सांगवीत आधार केंद्र नसल्याने आधार कार्डची कामे इतरत्र करावी लागत आहेत. एकाच जागी सर्व कामे व्हायला हवीत.’’

विविध दाखले डिजिटल ऑनलाईन झाले आहेत. जातीचा दाखला, जात पडताळणी ही कागदपत्रे आपापल्या जन्मगावी तहसील कार्यालयामधून मिळतात. इतर सर्व दाखले, परवाने ई सेवा केंद्रांमधून डिजिटल ऑनलाईन मिळतात. दरवर्षीप्रमाणे संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तत्परतेने कामे केली जात आहेत. तहसिल कार्यालयाकडूनही कार्यप्रणाली पोर्टल सुरळीत सुरू आहे.
- निलीमा भागवत, केंद्र चालक, जुनी सांगवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com