पिंपळे गुरवमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळे गुरवमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर
पिंपळे गुरवमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर

पिंपळे गुरवमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर

sakal_logo
By

पिंपळे गुरव, ता. १२ ः येथील मोरया पार्कमध्ये गल्ली नंबर सहा येथे गटाराचे चेंबर तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.

मुख्य रस्त्यावरील चेंबरमधुन सांडपाणी थेट रस्त्यावर पसरत असल्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. याबाबत येथील नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संबंधित विभागाला कळवले आहे, परंतु याकडे अद्याप लक्ष दिले नसल्याने याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक रहिवासी सुरेश सकट यांनी सांगितले की, चेंबरमधून येणारे गटाराचे पाणी दिवसभर काढावे लागते. त्याचप्रमाणे घरात आणि बाहेरही दुर्गंधी पसरल्याने घरात जेवणेही मुश्कील झाले आहे.
-------------------

पिंपळे गुरव ः मोरया पार्कमध्ये गल्ली नंबर सहा येथे गटाराचे चेंबर तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी वस्तीतील रस्त्यावर

Web Title: Todays Latest Marathi News Pmg22b00152 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top