
संविधान वाचविण्याची जबाबदारी आपली प्रा. हरी नरके यांचे परखड मत; डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्यानिमित्ताने गुंफले पहले पुष्प
पिंपळे गुरव, ता. १४ ः ‘‘संविधान हाच देशाचा विकासात्मक आराखडा आहे. संविधान वाचविण्याची जबाबदारी तुमची-आमची आहे. त्यासाठी आता बहुजनांनी सज्ज राहिलं पाहिजे. तसेच मानव विकासाच्या आड येणाऱ्या तथा मानवास हानिकारक, अशा रूढी परंपरा, श्रध्दा यांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून १९४९ लाच संपवून टाकले. डॉ. बाबासाहेबांच्या अफाट विद्यवत्तेमुळे जगाच्या पाठीवर ‘ज्ञानाचे प्रतिक’ म्हणूनच बाबासाहेबांची ओळख आहे.’’ असे परखड मत प्रा. हरी नरके त्यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव संयुक्त जयंती समिती जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, औंध कँम्प २०२२ च्या वतीने चार दिवसांचा १३ मे ते, १६ मे २०२२ पर्यंत कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात पहिल्या सत्राचे उदघाटनपर पहिले पुष्प नरके यांनी गुंफले. संयुक्त जयंतीचे प्रमुख वक्ते प्रा. हरी नरके, ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे यांच्या हस्ते यांनी विचार महोत्सवाचे उद्घाटन झाले. महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय विभागाचे राज्य आयुक्त प्रशांत नारनवरे तर बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये हे प्रमुख उपस्थितीत होते.
मधू कांबळे यांनी ‘धार्मिक, सामाजिक व राजकीय धुरंधर बाबासाहेब’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी बार्टीचे महासंचालक गजभिये यांचेही समायोजित भाषण झाले. नारनवरे यांनीही मत मांडले. या महोत्सवात विनायक गायकवाड यांच्या स्मरणार्थ गौतम डोळस यांचा सन्मान केला. पिंपळे गुरव येथील गौतमी निकम हिला सन्मानचिन्ह देऊन गौरविले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी समितीचे अध्यक्ष विजय गायकवाड, संदीप नितनवरे, गजानन कांबळे, विकास साळवे, ॲड. राजेश नितनवरे, राहुल काकडे, संजय मराठे, राहुल वाघमारे, विजय मागाडे, शंतनू डोळस आदींनी परिश्रम घेतले. विजय गायकवाड यांनी प्रस्तावना केली. शुभांगी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप नितनवरे यांनी आभार मानले.
फोटो ओळ : पिंपळे गुरव ः समाज रत्न पुरस्कार स्विकारताना गौतम डोळस, नारनवरे, गजभिये, हरी नरके, मधू कांबळे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pmg22b00155 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..