पिंपळे गुरव परिसरात पदपथावरच कचऱ्याचे ढीग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळे गुरव परिसरात पदपथावरच कचऱ्याचे ढीग
पिंपळे गुरव परिसरात पदपथावरच कचऱ्याचे ढीग

पिंपळे गुरव परिसरात पदपथावरच कचऱ्याचे ढीग

sakal_logo
By

पिंपळे गुरव, ता. २ : पिंपळे गुरव येथील कांकरिया गॅस गोडाऊन जवळ दररोज मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने येथे कुत्रे, जनावरे, पक्षी जमतात, त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. दुर्गंधीमुळे नागरिक हैराण होत असून याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
महापालिका व स्मार्टसिटी अंतर्गत अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. तसेच काही ठिकाणी विकासकामे पूर्णत्वास आली. अशा वेळेस महापालिकेच्या वतीने कचरा कुंडी मुक्त प्रभाग करण्याचा स्तुत्य उपक्रमाद्वारे महापालिकेने इंदूरच्या धर्तीवर वेगवेगळ्या प्रतिनिधींनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गाजावाजा करून शहर कचराकुंडी मुक्त झाल्याचे जाहीर केले. पण या परिसरातील कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रभागांमध्ये एकदा घंटागाडी येऊन गेल्यानंतर साचलेला कचरा प्रभागातील कचराकुंड्या काढल्यामुळे कुठे टाकायचा हा प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणावर विद्रुपीकरण होत असून परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कांकरिया गॅस गोडाऊन जवळील चौकात, परिसरात मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग वास्तव्यास आहे. त्यांच्या वेळेत घंटागाड्या येत नसल्याने हे उच्चशिक्षित नागरिक नाइलाजास्तव आपल्या घरात साठलेला कचरा महापालिकेचा कोणी कर्मचारी नाही हे पाहून गाडीत आणलेला कचरा रस्त्याच्या कडेला, जुन्या कचराकुंडीच्या जागी किंवा पदपथावरच टाकून निघून जातात.

सदर ठिकाणी तीन दिवस फिक्स पॉइंट लाऊन नागरिकांना गुलाबाची फुले देऊन जनजागृती करणार आहोत. नागरिक कामावरून आल्यानंतर कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडतात. ग्रीन मार्शल टीम सुद्धा अशा नागरिकांवर लक्ष ठेवून आहे.
-भीमराव कांबळे, आरोग्य निरीक्षक

कांकरिया गॅस गोडाऊनच्या बाजूला दररोज मोठ्या प्रमाणात कचरा साठतो. गैरसोय टाळण्यासाठी दिवसातून दोन वेळा ठरावीक वेळेत उपनगरात घंटागाड्या पाठवाव्यात, जेणेकरून लोक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा, मोकाट कुत्रे, पशुपक्षी यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
-अण्णा जोगदंड, स्थानिक नागरिक

Web Title: Todays Latest Marathi News Pmg22b00173 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top