फळभाज्यांच्या बियांचे घरोघरी जाऊन वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फळभाज्यांच्या बियांचे 
घरोघरी जाऊन वाटप
फळभाज्यांच्या बियांचे घरोघरी जाऊन वाटप

फळभाज्यांच्या बियांचे घरोघरी जाऊन वाटप

sakal_logo
By

पिंपळे गुरव, ता. ११ ः मानवी हक्क संरक्षण आणि जागृती, दिलासा संस्था, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद या संस्थांच्यावतीने कारले, दोडके, गवार, श्रावणी घेवडा, भोपळा, वाल, वांगी,
पपई, पेरू, घोसाळे, कढीपत्ता नागरिकांच्या परसबागेत लावले व ज्यांच्याकडे परसबाग नाही, अशा नागरिकांना कुंडीत लावण्यासाठी बिया मोफत दिल्या.
मुख्यत्वे करून नवी सांगवी, पिंपळे गुरव व शहराच्या आजूबाजूच्या उपनगरातही फळभाज्यांच्या बियांचे वाटप करण्यात आले. यावेळी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले, ‘‘आम्ही गेल्या आठवड्यापासून हा उपक्रम राबवत आहोत. सध्या आपल्या परसबागेसाठी पुरेसा वेळ देता येत नाही किंवा नागरिकांकडे परसबाग ही नाही. बरीच माणसे भाज्या विकत घेणे पसंत करतात. म्हणूनच ‘परसबाग फुलवू, आपल्या अंगणी’ हा उपक्रम राबवला आहे.
यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले, ‘‘प्रत्येक व्यक्ती कीटकनाशके फळांच्या व भाज्यांच्या माध्यमातून दररोज खात आहे. यामुळे सर्वांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. ज्यांच्याकडे वेळ आणि परस बागेत जागा आहे किंवा टेरेसवर जागा असेल त्यांनी आपल्या जागेत जरूर भाज्या लावाव्यात व फवारणी न केलेली स्वतः पिकवलेल्या फळभाज्या खाव्यात. यामुळे आपल्याला आनंदही मिळेल आणि पैशाची बचत होईल.’’

पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले, ‘‘सध्या औद्योगिक क्षेत्रातील कामगारांनी अशा वेगवेगळ्या संकल्पना राबवून घरच्या घरी पालेभाज्या लावाव्यात म्हणजे रसायनमुक्त भाजी आपल्या कुटुंबाला मिळेल व आर्थिक हातभार लागेल आणि नवीन पिढीचेही कृषीविषयक ज्ञान वाढेल.’’

यावेळी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, तसेच महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, विकास शहाणे, मुरलीधर दळवी, सुभाष चव्हाण, सचिन करंजवणे, संजना करंजावणे, डॉ. भाऊसाहेब लोंढे, जयश्री गुमास्ते, अरविंद मांगले, प्रगती घोरपडे, मीना करंजवणे, वसंतराव चकटे, अलका लोंढे, धनंजय महाले, गजानन धाराशिवकर यांनी सहभाग नोंदवला.
फोटो ः 00389

Web Title: Todays Latest Marathi News Pmg22b00179 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top