पिंपळे गुरवच्या चौकात लाल मातीचा चिखल दुचाकी व पादचारी घसरून अपघाताच्या घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळे गुरवच्या चौकात
लाल मातीचा चिखल
दुचाकी व पादचारी घसरून अपघाताच्या घटना
पिंपळे गुरवच्या चौकात लाल मातीचा चिखल दुचाकी व पादचारी घसरून अपघाताच्या घटना

पिंपळे गुरवच्या चौकात लाल मातीचा चिखल दुचाकी व पादचारी घसरून अपघाताच्या घटना

sakal_logo
By

पिंपळे गुरव, ता. २८ ः पिंपळे गुरव येथील कांकरिया गॅस गोडाऊनच्या चौकात एकाच ठिकाणी लाल माती टाकून ठेवली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ती तशीच पडून आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे ती माती चिखलयुक्त होऊन रस्त्यावर आल्याने चौकात वळण घेताना अनेक दुचाकीस्वार व नागरिक पाय घसरून पडले आहेत. चौकातच असलेल्या मातीमुळे चौक निसरडा झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून निसरडा व धोकादायक चौक अधिकारी यांना दिसत नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
पिंपळे गुरव परिसरात सगळीकडे विकास कामे चालू आहेत तर काही ठिकाणी अर्धवट कामे राहिलेली आहेत. संततधार पावसामुळे सर्दी, खोकला, ताप, डेंगी यासारख्या आजारामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच रस्त्याच्या कडेला डक्टमध्ये टाकण्यासाठी लाल माती आणली आहे. चौकातील लाल मातीचा झालेला चिखल उचलण्याची मागणी येथील स्थानिकांकडून होत आहे.


चौक सुशोभीकरणाचे काम चालू असून, ते आता पूर्णत्वावर आले आहे. चौकातील पडलेली माती व झालेला चिखल तातडीने काढून चौक स्वच्छ करून घेतला जाईल.
मनोज सेठिया, ''ह''प्रभाग कार्यकारी अभियंता


पावसात विकासकामे करताना प्रशासनाने नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवली पाहिजे. पावसामुळे आता ती माती चिखलयुक्त झाल्यामुळे चौकात वळण घेताना दुचाकीस्वार व नागरिक पाय घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अण्णा जोगदंड, नागरिक

कोट
मातीचे ढिगारे हटवावेत, या रस्त्याने सर्वाधिक वाहने ये-जा करतात. त्यांच्यासाठी मोकळा चौक हवा आहे. त्यामुळे प्रशासनाने चौकाच्या मधोमध मातीचे ढिगारे हटवून वाहनधारकांसाठी रस्ता त्वरित खुला करून द्यावा.
शंतनू डोळस, स्थानिक नागरिक
फोटो ः 00405

Web Title: Todays Latest Marathi News Pmg22b00184 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top