सडलेल्या कचऱ्याने भरले गणेश विसर्जन हौद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सडलेल्या कचऱ्याने भरले 
गणेश विसर्जन हौद
सडलेल्या कचऱ्याने भरले गणेश विसर्जन हौद

सडलेल्या कचऱ्याने भरले गणेश विसर्जन हौद

sakal_logo
By

पिंपळे गुरव, ता. २० ः पिंपळे गुरव येथील पवना नदीपात्र परिसरात पवना घाटावरील गणेश विसर्जन हौदांची दुरवस्था झाली आहे. या हौदांत सध्या प्लास्टिक, चिंध्या, गाळ आणि कचरा साचला आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र, महापालिकेच्या देखभालीअभावी लाखो रुपये खर्चून बांधलेल्या गणेश विसर्जन हौदांमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

मात्र, यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणार असल्याने नदीपात्रातील विसर्जन घाटावर भक्तांचा ओढा अधिक असणार आहे. यामुळे या घाटांची तातडीने दुरुस्ती व साफसफाई करावी, अशी मागणी गणेशभक्तांकडून होत आहे. गणेशोत्सवापूर्वी हे विसर्जन हौद महापालिकेने सुसज्ज स्थितीत ठेवण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या घाटावर बाजूच्या झाडांचा पडणारा पालापाचोळा जाळण्यात येत असल्याचे दिसते. घाटाच्या पायऱ्यांपासून नदीपात्राच्या भागात गवत उगवले आहे. रेलिंगच्या भागात पाणी असून, त्यात कचरा मोठ्या प्रमाणात अडकलेला आहे. घाटावर दिवसाही मद्यपींचा वावर असतो. त्यामुळे या घाटावर ठिकठिकाणी मद्याच्या बाटल्या पडलेल्या आहेत. फुटलेल्या बाटल्यांच्या काचा घाटावर पडून आहेत. या घाटावर दुरुस्ती देखभालीविषयी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोट
महापालिकेने हजारो रुपये खर्च करून पवना घाटावर गणेश विसर्जन हौद बांधले आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा झाला आहे. या हौदांत टाकलेला कचरा कुजल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.
- संतोष देवकर, स्थानिक नागरिक

कोट
मध्यभागावर हे निर्माल्याचे ढीग साचून असतात. त्यातच, नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने तसेच मोकाट जनावरे खाण्याच्या शोधात हे निर्माल्य अस्ताव्यस्त करत असल्याने ते कचऱ्यासारखे पडून आहे.
- शंतनू डोळस, स्थानिक नागरिक