पिंपळे गुरवमध्ये ज्येष्ठ व बालगोपालानी साजरी केली शिवजयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळे गुरवमध्ये ज्येष्ठ व बालगोपालानी
साजरी केली शिवजयंती
पिंपळे गुरवमध्ये ज्येष्ठ व बालगोपालानी साजरी केली शिवजयंती

पिंपळे गुरवमध्ये ज्येष्ठ व बालगोपालानी साजरी केली शिवजयंती

sakal_logo
By

पिंपळे गुरव, ता. २० ः काशिद पार्क मधील संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली. पत्रकार प्राचार्य जितेंद्र पांडे यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. बाल गोपालांच्या सह सर्वांनी ‘जय भवानी ,जय शिवाजी’ घोषणा देत मिरवणूक काढली. याप्रसंगी अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके, कार्याध्यक्ष पोपट चव्हाण, कोषाध्यक्ष सुभाष जैन, श्रीधर साबळे, चांदमल सिंगवी, संजय मानकर, अनिल भोळे, पुरोहित सर, सुरेश दिघे, गिरिधर सोळंकी, सयाजीराव जाधव, रवींद्र कोठवदे, काळे, चांदेगावे, शत्रुघ्न धुळे, दत्तात्रेय वाणी, मोहन भोईटे आणि बालगोपाल उपस्थित होते. शिक्षक धनेशकुमार पुरोहित आणि जितेंद्र पांडे यांनी मुलांना प्रबोधन केले. कार्यक्रमानंतर अध्यक्षांनी सर्वांना जिलेबी वाटण्यात आली.