
पिंपळे गुरवमधील शिबिरात ११० जणांची तपासणी
पिंपळे गुरव, ता. ११ ः पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ गार्डनसमोर देसाई आय हॉस्पिटल व सनराइज् मेडिकल फाउंडेशन यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक व महिलांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर झाले. त्याचे उद्घाटन प्रभाग क्रमांक ३१ च्या महिलाध्यक्षा कोमल गोंडाडकर यांनी केले.
या शिबिरामध्ये ११० ज्येष्ठ व महिलांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये नऊ लोकांना मोतीबिंदू आढळला. ज्या नागरिकांना मोतीबिंदू आढळला. त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रिया अंतर्गत मोफत किंवा अत्यल्प दरात करण्यात येईल, असे सनराइजचे प्रवक्ते संजय मराठे यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रा. उमेश बोरसे, सनराईजचे प्रवक्ते संजय मराठे, बाळासाहेब देवकर, ॲड. प्रवीण चौगुले आदी उपस्थित होते. प्रियांका सोनवणे, सुप्रिया भोसले व विशाखा सांगळे यांनी सहकार्य केले.