
पिंपळे गुरवमध्ये वाहतूक विस्कळित सिग्नल यंत्रणा पुन्हा बसवली नसल्याने अडचणीत वाढ
पिंपळे गुरव, ता. १४ ः पिंपळे गुरव येथील कृष्णा चौकात वाहतूक नियंत्रित करण्याच्या उद्देशाने बसवलेली सिग्नल यंत्रणा रस्ता रुंदीकरण कामाच्या उद्देशाने स्मार्टसिटीने काढून टाकली होती. परंतु आज काम पूर्ण होऊन दीडवर्ष उलटले तरीसुद्धा ही सिग्नल यंत्रणा पूर्ववत बसवली नसल्याने येथील वाहतूक अनियंत्रित झाली आहे. त्यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होत आहे.
सांगवी वाहतूक शाखेअंतर्गत असलेल्या पिंपळे गुरव, नवी सांगवी भागात एकही वाहतूक कर्मचारी कुठल्याच चौकात दिसत नाही.त्यामुळे सांगवी वाहतूक शाखा फक्त कागदावरच आहे का असा संतप्त सवाल ज्येष्ठ नागरिक उपस्थित करत आहेत.
कृष्णा चौकात मोठी बाजारपेठ, फळबाजार तसेच बसथांबे आहे. येथील रस्ते कायमचे नागरिकांनी गजबजलेले असतात. तसेच दुसरीकडे रस्त्यावरील वाहनांची संख्याही वाढली आहे. पिंपळे गुरवकडून साईचौकाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची खूप गर्दी वाढली आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सिग्नलची आवश्यकता आहे. परंतु, सिग्नल नसल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची वाहतूक पोलिस व महापालिका प्रशासन वाट पाहत आहे का? असा प्रश्न नागरिकांमधून होत आहे.
कोट
रस्ता रुंदीकरणाच्या कामसाठी स्मार्ट सिटी अंतर्गत सिग्नल काढले होते. या ठिकाणचे काम पूर्ण झाले असून, या चौकात लवकरात लवकर सिग्नल व्यवस्था पूर्ववत करण्यात येईल.
जितेंद्र अहिरे,
प्रभारी कनिष्ठ अभियंता
विद्युत विभाग ‘ह’ प्रभाग
पिंपळे गुरव येथील कृष्णा चौकातील सिग्नल यंत्रणेबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून व त्वरित पत्र व्यवहार करून येथील सिग्नल यंत्रणा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यात येईल.
प्रसाद गोकुळे,
वाहतूक पोलिस निरीक्षक
कोट-
कृष्णा चौकात सिग्नल तसेच वाहतूक पोलिस नसल्याने भरधाव वाहन चालवणे, चौकातून चुकीच्या पद्धतीने गाडी चालवून वाहतुकीस अडथळा करणे, असे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावायची कुणी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संजय मराठे,
स्थानिक नागरिक
-----------
फोटो ओळ
पिंपळे गुरव ः कृष्णा चौकात वाहतूक नियंत्रित करण्याच्या उद्देशाने बसवलेली सिग्नल यंत्रणा नसल्याने नियमित वाहतूक कोंडी होत आहे.
00626, 00627