
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपळे गुरवमध्ये उपक्रम
पिंपळे गुरव, ता. ९ ः येथील शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘प्ले फॉर इकव्यलिटी’ समतेसाठी खेळा ही संविधानातील मूलभूत तत्व स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय अंगीकार व्हावे, ते जपावे म्हणून फूटबॉल मॅचचे आयोजन केले आणि महामानवाची जयंती साजरी केली.
या मॅचसाठी १८ टीमने सहभाग घेऊन रविवारी (ता. ७) दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत, टू अँड फिटनेस क्लब पिंपळे गुरव येथे संपन्न झाले. प्रथम पारितोषिक वकांडा आणि द्वितीय पारितोषिक व्हेनम यांनी पटकवले. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी सीईओ नगरपालिका अनिल जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, धम्मचारी संघाभद्र, छाया कांबळे आणि चार्ली वरप्रभ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बेस्ट गोलकिपर आयुष भट, बेस्ट प्लेअर गौतम पॅन्थर आणि बेस्ट गोलस्कोरर अनिश यांना सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र टीमसाठी खेळलेले सुमीत भंडारी, श्रीकांत यांचे सहभाग घेतल्याबद्दल विशेष स्वागत करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्याम जगताप, राहुल जवळकर, सारथी फाउंडेशन, विसडम अकॅडेमी, चार्ली वरप्रभ, प्रज्योत कांबळे आदींनी सहभाग दर्शविला.