दिव्यांग प्रमाणपत्र विशेष द्रुतगती मोहीम

दिव्यांग प्रमाणपत्र विशेष द्रुतगती मोहीम

पिंपळे गुरव, ता. १६ ः शासकीय जिल्हा रूग्णालयामार्फत मानसोपचार विभाग पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे व प्रतिभा कॉलेज चिंचवड तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या सहकार्यातून दिव्यांगाना प्रमाणपत्र मिळावे यासाठी मोफत द्रुतगती मोहीम हाती घेतली आहे. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज केले असतील मात्र, प्रमाणपत्र मिळाले नसतील, अशा अर्जदारांनी ऑनलाइन अर्जाची प्रत, दिव्यांगांचे जुने मुळ प्रमाणपत्र, रुग्णाचे आधारकार्ड, आई-वडिलांचे आधारकार्ड, रेशनकार्ड, तसेच आजपर्यंतचे उपचार घेतलेले दवाखान्यातील कागदपत्रे, सर्व कागदपत्रे ओरिजनल व झेरॉक्स स्वरूपात आणावीत. (ता.१७) ते (ता. १९) पर्यंत सकाळी ९:३० ते १२:३० या वेळेत वरील कागदपत्रे जमा करण्यासाठी ओपीडी नं ३१, मानसोपचार विभाग, जिल्हा रूग्णालय, सांगवी फाटा पुणे येथे हजर रहावे व या मोहिमेचा लाभ घ्यावा असे विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com