‘मेरा लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ 
मोहिमेची पिंपळे गुरवमध्ये सुरुवात

‘मेरा लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ मोहिमेची पिंपळे गुरवमध्ये सुरुवात

पिंपळे गुरव, ता. २० ः पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व सामाजिक संस्थांच्या वतीने पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये ‘मेरा लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ मोहिमेची सुरुवात ‘ड’ क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली.
या वेळी आरोग्य अधिकारी महेश आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती. या मोहिमेविषयी बोलताना आढाव म्हणाले की, नागरिकांनी पालिका राबवीत असलेल्या मोहिमेअंतर्गत रिड्यूस, रियूज रिसायकलिंग म्हणजेच कचरा कमी करा, वस्तूचा पुनर्वापर, टाकाऊ पासून नवीन वस्तू तयार करणे हाच पालिकेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेस सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी ‘पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा’ असा संदेश देणारा पेहराव करून पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी आपल्या घरातील टाकाऊ वस्तू टायर, कपडे, टीव्ही, मोबाईल, प्लॅस्टिक, पादत्राणे, खेळणी आदी वस्तू आणून जिजाऊ उद्यानात देण्याची नागरिकांना शपथ दिली. राहुल जवळकर यांनी घनकचरा, ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा वेगळा करून पालिकेला सहकार्य करावे व आपल्याकडून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. तसेच पालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुकही यावेळी केले.
याप्रसंगी आरोग्य निरीक्षक बी. आर. कांबळे, बेसिक्स संस्थाचे वॉर्ड इन्चार्ज श्रीराम डोंगरे, मीना करंजवणे, संगीता जोगदंड, नवचैतन्य हास्य क्लब, सदिच्छा महिला गट तसेच मुरलीधर दळवी, लक्ष्मण दरेकर, शिवाजी निम्हण, बाळासाहेब देवकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com