अनधिकृत थांब्यांमुळे अपघातांना निमंत्रण काळेवाडी फाटा ते सांगवी फाटा दरम्यान खासगी बसगाड्यांचे अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत थांब्यांमुळे अपघातांना निमंत्रण  
काळेवाडी फाटा ते सांगवी फाटा दरम्यान खासगी बसगाड्यांचे अतिक्रमण
अनधिकृत थांब्यांमुळे अपघातांना निमंत्रण काळेवाडी फाटा ते सांगवी फाटा दरम्यान खासगी बसगाड्यांचे अतिक्रमण

अनधिकृत थांब्यांमुळे अपघातांना निमंत्रण काळेवाडी फाटा ते सांगवी फाटा दरम्यान खासगी बसगाड्यांचे अतिक्रमण

sakal_logo
By

पिंपळे गुरव, ता. २३ ः काळेवाडी फाटा ते सांगवी फाटा दरम्यान मुख्य रस्त्यावरच खासगी बसगाड्यांनी अनधिकृत घेतलेले थांबे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याने या रस्त्यावर दररोज छोटे - मोठे अपघात होत आहेत.
येथील रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक सर्रासपणे सुरू असून, त्यामुळे दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. पोलिस प्रशासन आणि नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संबंध इतके समन्वयाचे आहेत की जणू काही वाहतूक पोलिसांकडून खासगी वाहतूकदारांना कोणताही धोका होऊ शकणार नाही, असे चित्र दिसते.
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतुकीमुळे रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यापूर्वी अनेक वेळा दोन ट्रॅव्हल बसमध्ये अडकून अपघात झाले आहेत.

‘‘मुख्य काळेवाडी रस्त्यावर ट्रॅव्हलची २१ कार्यालये आहेत. लोकांच्या तक्रारीनुसार वाहतूक कोंडी होत असल्याने काळेवाडी ते सांगवी फाट्यापर्यंतचा मुख्य रस्ता खासगी ट्रॅव्हल्स बसला बंद केला आहे. त्यामुळे त्या बसगाड्या जागा मिळेल तिथे प्रवासी घेत आहेत. यामुळे वाहतूक विभागाकडून आतापर्यंत १० गाड्यांवर खटले दाखल केले आहेत, तसेच एका गाडीवर ३१,६०० रुपये एवढा दंड वसूल केला आहे. यापुढेही अशा वाहनांवर कारवाईचा कडक बडगा वाहतूक विभागाकडून उगारला जाईल.

सतीश नांदूरकर, वाहतूक पोलिस निरीक्षक

कोट
खासगी ट्रॅव्हल बसगाड्या रस्त्याच्या मध्येच उभ्या राहत आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते, तर दुचाकीस्वार व पादचाऱ्यांकडून ये-जा करताना वादाला तोंड द्यावे लागत आहे.

साहेबराव धुंदळे,
स्थानिक नागरिक

फोटो ः 00712