पिंपळे गुरव परिसरात 
पादचारी मार्गाची दुरवस्था

पिंपळे गुरव परिसरात पादचारी मार्गाची दुरवस्था

पिंपळे गुरव, ता. २७ ः एम.एस. काटे चौकाकडून दापोडीकडे जाणाऱ्या शिवरामनगरच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत पादचारी मार्ग तयार केला. मात्र, या मार्गाची काही दिवसातच दुरवस्था झालेली बघायला मिळत आहे. सध्याच्या स्थितीत या पादचारी मार्गावरील फरशा तुटलेल्या अवस्थेत असून पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे.

या पादचारी मार्गाच्या मधोमध काही ड्रेनेजचे चेंबर्स असून त्यावरील झाकणे तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे या चेंबर्समध्ये पाय घसरून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच सध्या परिसराला कचरा कुंडीमुक्त केल्याने नागरिक रस्त्याच्या कडेला किंवा जिथे मोकळी जागा मिळेल तिथे तथा याच पादचारी मार्गाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत चालता चालता कचरा फेकून जातात, तो कचराही पालिका उचलून नेत नाही. त्यामुळे दुर्गंधीचाही सामना या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना करावा लागतो. पालिका अशा गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते की काय? असा प्रश्न आता या पादचारी मार्गावरून ये-जा करणारे त्रस्त नागरिक करीत आहेत.

या पादचारीमार्गावर सायंकाळच्या वेळेला ज्येष्ठ नागरिकांची फिरायला येणाऱ्यांची संख्या अधिक असून त्यांच्यासमवेत लहान बालकेसुद्धा असतात. त्यामुळे या पादचारी मार्गावरील तुटलेल्या फरशांमुळे व मार्गाच्या मधोमध असलेल्या चेंबर्सवरील तुटलेल्या झाकणांमुळे अपघात होण्याची शक्यता बळावत आहे.

‘‘या पादचारी मार्गावरच्या ठिकठिकाणची पाहणी करून त्वरित तुटलेल्या फरशांची व तुटलेल्या चेंबर्सची दुरुस्ती केली जाईल.’’
- ज्योती राजापुरे, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य विभाग

‘‘या पादचारी मार्गावरील तुटलेल्या फरशांमुळे व मार्गाच्या मधोमध असलेल्या चेंबर्सवरील तुटलेल्या झाकणांमुळे अपघात होण्याची शक्यता बळावत आहे. याकडे पालिकेने त्वरित लक्ष देऊन याची तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी.’’
- सुरेश सकट, स्थानिक नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com