पिंपळे गुरवमध्ये
फ्लॅटला आग

पिंपळे गुरवमध्ये फ्लॅटला आग

पिंपळे गुरव, ता. १ ः पिंपळे गुरव येथील मोरया पार्क लेन नं. १ मधील श्री साई मानसी या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सायंकाळी साडेचारच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. पाणी तापवण्याच्या हिटरचे बटन चालू राहिल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली.
तिसऱ्या मजल्यावरील स्वप्नील पाटील आणि प्रफुल्ल पाटील यांना आग लागत असल्याचे समजले. त्यांनी ताबडतोब महापालिकेच्या अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. काही वेळातच पिंपरी आणि रहाटणी विभागाच्या अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. पिंपरी अग्निशमन दलातील लिडिंग फायरमन बाळासाहेब वैद्य आणि रहाटणी अग्निशमन दलातील लिडिंग फायरमन विकास तोडरमल शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com