वटपौर्णिमेनिमित्त वृक्षसंवर्धनाचा संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वटपौर्णिमेनिमित्त 
वृक्षसंवर्धनाचा संदेश
वटपौर्णिमेनिमित्त वृक्षसंवर्धनाचा संदेश

वटपौर्णिमेनिमित्त वृक्षसंवर्धनाचा संदेश

sakal_logo
By

पिंपळे गुरव, ता. ३ ः पिंपळे गुरव येथील ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्यावतीने वटवृक्ष रोपण करून वटपौर्णिमा हा दिन साजरा करण्यात आला. वटवृक्षाला दोऱ्याने बांधून साजरा करण्यापेक्षा जमिनीमध्ये रोपटे लावून, साजरा करावा अशा संकल्पनेतून संस्थेचे अध्यक्ष कैलास बनसोडे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षसंवर्धनाचा व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. याबरोबरच हे झाड वर्षभर देखभाल करून, जगवण्याचा संकल्पही केला आहे.
सुरेखा बनसोडे म्हणाल्या, ‘‘वडाची फांदी तोडून नाही तर वडाचे रोप लावून वटपौर्णिमा साजरी करा. सर्वात दाट सावली देणारा वृक्ष म्हणजे वड. वडाच्या पारंब्यांमधून सतत पाणी वाहत असते. त्यामुळे जिथे वडाचे झाड असते, त्या खालची जमीन सदैव ओलसर असते.’’
यावेळी सुरेखा बनसोडे, प्रमिला इनामदार, तृप्ती साबळे, नूतन सोनवणे, ज्योती चौधरी, अश्विनी घोडेकर, रंजना साबळे, बबिता राजपूत संघटनेचे महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

फोटो ः 00732