पिंपळे गुरव मधील मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे मोफत चार टँकर

पिंपळे गुरव मधील मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे मोफत चार टँकर

पालखी सोहळ्यासाठी
मोफत चार टॅंकर

पिंपळे गुरव, ता. ५ ः संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुण्याहून पंढरपूरपर्यंत पिंपळे गुरव येथील मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पाण्याचे चार टॅंकर मोफत देण्यात आले आहेत.
मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने पिंपळे गुरव येथे टँकरचे पूजन करण्यात आले. या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र. ११ सोपानकाका कराडकर, देहू ते पंढरपूर दिंडी क्र. २२१ ललिता विठ्ठल घाडगे, देहू ते पंढरपूर दिंडी क्र. १९७ बाबूरावमहाराज तांदळे व मुख्य पालखी सोहळ्यासोबत असे चार पिण्याच्या
पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठविण्यात आले आहेत.

यावेळी मारुतीमहाराज कोकाटे, तांदळे महाराज, शिव कीर्तनकार डॉ. गजानन महाराज वाव्हळ, शशिकांत महाराज कुलकर्णी, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक नाना काटे, राजेंद्र जगताप, अण्णा जोगदंड, प्रा. गणेश ढाकणे, रवींद्र जाधव, अमोल नागरगोजे आदी उपस्थित होते. तुकाराम सूर्यकांत कुरुलकर यांनी आभार मानले.

फोटोः 00737

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com