
डॉक्टर महिलांचा रांका ज्वेलर्सतर्फे सन्मान
पिंपरी, ता. २७ ः शारदा नवरात्र उत्सवास सुरुवात झाली असून, पहिल्या माळेच्या दिवशी पांढरा रंग असल्याने रांका ज्वेलर्स पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने डॉक्टर महिलांचा सन्मान करण्यात आला.
रांका ज्वेलर्स गेले अनेक वर्षे सोने चांदीच्या व्यवसायात आहे. या व्यवसायात त्यांनी अनेक ग्राहकांची मने जिंकून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. व्यवसाय करीत असताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेने रांका ज्वेलर्स पिंपरी-चिंचवड शोरूम यांच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविला जात असतात. त्याचा एक भाग म्हणून शारदा नवरात्र उत्सवानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील डॉक्टर महिलांचा सन्मान करण्यात आला.
नवरात्र उत्सवात नऊ दिवस प्रत्येक दिवसाच्या कलरप्रमाणे समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा रांका ज्वेलर्स पिंपरी-चिंचवड शोरूम यांच्या वतीने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आशा रांका यांनी दिली. या उपक्रमात ‘आपला आवाज आपली सखी’च्या संचालिका संगीता तरडे यांचे मोलाचे योगदान लाभले, असेही आशा रांका यांनी सांगितले. डॉक्टर महिलांचा सन्मान आशा रांका व तेजपाल रांका यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कार केलेल्यांमध्ये डॉ. लीना बोरुडे, डॉ. वैदेही जंजाळे, डॉ. ज्योती सलगरकर, डॉ. मीनल दीपक लाड, डॉ. अर्चना रवींद्र साळवे, डॉ. भारती पाटील, डॉ. मानसी सोनगिरकर बोराडे, डॉ. प्रज्ञा डोळे, डॉ. प्रज्ञा खोसे, डॉ. संगीता गायकवाड, डॉ. सीमा शेडगे, डॉ. रश्मी केदारनाथ कल्याणपुरे, डॉ. नेहा रोकडे, डॉ. शुभदा जोशी, डॉ. वैशाली पाटील, डॉ. प्रतिभा कर्चे, डॉ. शीतल यादव, डॉ. पल्लवी घोलप, डॉ. पल्लवी प्रसाद, डॉ. सरोज राऊत अबिंके, डॉ. रचना जयस्वाल, डॉ. अमृता घोरपडे आदींचा समावेश आहे.