पिंपरी शहरात एक जूनपासून चहापासून ते जेवणापर्यंत होणार महाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hotel
पिंपरी शहरात एक जूनपासून चहापासून ते जेवणापर्यंत होणार महाग

पिंपरी शहरात एक जूनपासून चहापासून ते जेवणापर्यंत होणार महाग

पिंपरी - गेल्या काही महिन्यांपासून इंधन, खाद्यतेल, भाज्या, मालवाहतूक दरात सतत वाढत आहेत. याचाच परिणाम आता शहरातील हॉटेल व रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या दरावरही होणार आहे. एक जूनपासून दहा टक्के दरवाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे चहापासून जेवणापर्यंत सारे काही महागणार आहे.

लॉकडाउन आणि कोरोनामुळे हॉटेल व्यावसायिकांची विस्कटलेली आर्थिक घडी आता कुठे सुरळीत होत आहे. तरीही अद्याप ३० टक्के हॉटेल बंद आहेत. स्वत:च्या मालकीच्या जागा असलेले व्यावसायिक तग धरून आहेत. मात्र, ५० हजार ते एक लाख रुपये भाडे तत्त्वावर असलेले हॉटेल व्यावसायिक हैराण आहेत. लोकांनीही बचतीच्या सवयीमुळे हॉटेलिंगला वगळले आहे. त्यातच गॅसपासून खाद्यतेलापर्यंतच्या किंमती वाढतच निघाल्या आहेत. दररोज लागणाऱ्या भाजीपाल्याचे दर स्थिर राहत नाहीत. यातूनच खाद्यपदार्थांचे दर वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

गॅस, खाद्यतेल महागले आहे. अत्यावश्यक असलेला लिंबू वीस रुपयाला तीन झाला आहे. वाहतूक खर्च परवडत नाही. कामगारांची कमतरता असल्याने जादा पगार द्यावा लागतो. महागाई साऱ्यांनाच भेडसावत आहे. त्यामुळे, नाइलाजाने दहा टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात अधिक दरवाढ होवू शकते.

- पद्मनाभन शेट्टी, अध्यक्ष, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन

शहरातील संख्या

  • हॉटेल व रेस्टॉरंट : ७००

  • हॉटेल व्यावसायिक : २०००

Web Title: Todays Latest Marathi News Pne22a52569 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top