सौरउर्जेवर धावतेय मेट्रो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Metro
सौरउर्जेवर धावतेय मेट्रो

सौरउर्जेवर धावतेय मेट्रो

पिंपरी - पुणे मेट्रो (Metro) पर्यावरणपूरक (Eco-Friendly) असेल, अशी घोषणा केली होती. त्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. मेट्रो धावण्यासाठी स्थानकांवर सोलर पॅनेल (Solar Panel) बसविण्यात येत आहेत. पिंपरीतील संत तुकारामनगर आणि पुण्यातील गरवारे कॉलेज स्थानकांवर पॅनेल बसविण्यात आले असून, ते कार्यान्वित झाले आहे. अन्य स्थानकांवरही सोलर पॅनेल बसविण्यात येणार असून, त्याद्वारे अकरा मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट आहे.

मेट्रोचे स्वारगेट ते पिंपरी मार्गावर १४ आणि वनाज ते रामवाडी मार्गावर १८ मेट्रो स्थानके नियोजित आहेत. शिवाय, निगडी आणि कात्रजपर्यंत विस्तारीकरणाचे विचाराधीन आहे. पुणे मेट्रो पर्यावरणपूरक असेल, असे पहिल्यापासूनच सांगितले जात आहे. त्याअंतर्गत मेट्रो मार्गात अडथळे ठरणारी झाडे काढून त्यांचे पुनर्रोपण केले आहे. मात्र, त्यातील बहुतांश झाडे जगलीच नसल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. मेट्रोने काही ठिकाणी वृक्षारोपणही केले आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाणी जमिनीत मुरवून भुजल पातळी वाढविण्याचेही त्यांचे नियोजन आहे. तसेच, मेट्रो धावण्यासाठी आवश्यक असलेली वीज सौरउर्जेपासून मिळविण्याचेही नियोजन आहे. त्याअंतर्गत पिंपरीतील वल्लभनगर व पुण्यातील गरवारे कॉलेज स्थानकाच्या छतावर सोलर पॅनेल बसविले आहेत. त्याद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा वापर सुरू झाला आहे. शिवाय, स्थानकापासून जवळच वल्लभनगर एसटी स्थानकासमोर स्वतंत्र उपकेंद्रही उभारले आहे. मेट्रो धावण्यासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा मार्गावरील वीजवाहक ट्रॅक्शन अर्थात वीजवाहक तारांद्वारे दिला जात आहे. वल्लभनगर ते फुगेवाडी दरम्यान, मेट्रोची चाचणी घेतली. त्यावेळी २५ किलो व्होल्टचा विद्युत प्रवाह वापरला होता. या ट्रॅक्शनसह मार्ग व स्थानकावरील दिवे, लिफ्ट, सरकता जिना यासाठी विजेचा वापर केला जात आहे.

‘वल्लभनगर व गरवारे कॉलेज स्थानकावर सोलर पॅनेल बसविले असून, ते कार्यान्वित केले आहेत. त्यातून निर्माण होणारी वीज वापरली जात आहे. सर्व स्थानके व डेपो येथे मोठ्या प्रमाणावर सौर पॅनेल बसविण्यात येणार आहेत. साधारणतः अकरा मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे नियोजन आहे.’

- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, जनसंपर्क विभाग, मेट्रो

सौरऊर्जेवर मेट्रो चालवा, अशी पहिल्यापासून आमची मागणी आहे. त्यांनी कार्यवाही सुरू केली आहे. सौरऊर्जेवर मेट्रो चालणार असल्याने प्रदूषण होणार नाही. भविष्यात दोन्ही मार्गांवर गाड्या वाढतील, त्यामुळे सौर पॅनेलचीही संख्या वाढवायला हवी. विजेवर चालणाऱ्या वाहनांनाच मेट्रो स्थानकांपर्यंत येण्या-जाण्यासाठी वापर व्हावा.’

- सिकंदर घोडके, सदस्य, पर्यावरण संवर्धन समिती, पिंपरी-चिंचवड

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57248 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top