पीएमपीची बससेवा तळेगाव परिसरात मिळावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएमपीची बससेवा
तळेगाव परिसरात मिळावी
पीएमपीची बससेवा तळेगाव परिसरात मिळावी

पीएमपीची बससेवा तळेगाव परिसरात मिळावी

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे या शहराच्या जवळपास असलेली गावे आता गेल्या ५-६ वर्षात झपाट्याने विकसित होत आहेत. वराळे,आंबी, माळवाडी, जुने तळेगाव, कातवी, इंदोरी आदी ठिकाणी मोठमोठे प्रकल्प वाढत आहेत. ‘एमआयडीसी’मध्ये नवनवीन कारखाने, ऑफिसेस उभारले जात आहेत. परिणामी लोकवस्तीही वाढत आहे. नागरिकांना आपल्या राहत्या घरापासून कामाच्या जागी जाण्यासाठी रस्ते-वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. बरे सगळ्यांकडे स्वतःची वाहने असतातच, असे नाही व ज्येष्ठ नागरिकांना कुठे जरा बाहेर जायचे तर सरकारी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही तरी पुणे महापालिकेने पीएमपीच्या बस गाड्यांची सोय केली तर सुखकारक होईल. संबंधितांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा, ही विनंती.
प्रकाश वा. दातार
तळेगाव दाभाडे, (ता. मावळ)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57720 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top