
विद्यार्थ्यांचा मेळावा अन् पारितोषिक वितरण
पिंपरी ः डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डी. फार्म) आकुर्डीच्या वतीने विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. ७५ माजी विद्यार्थ्यांनी सोहळ्यास उपस्थिती लावली. माजी विद्यार्थ्याचा सत्कार शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. एन. एस. व्यवहारे, जस्मीता कौर, प्राचार्य डॉ. एस. व्ही. देशपांडे व उपप्राचार्या भावना कापसे यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य डॉ. एस व्ही देशपांडे यांनी विविध सामाजिक कार्यात व महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी अग्रेसर असलेल्या विद्यार्थ्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला. सूत्रसंचालन आदिती जहागीरदार यांनी केले. आभार प्रा. चित्रलेखा सोनवणे यांनी मानले. संघटनेचे सचिव गीतांजली आनंदकर, खजिनदार अभिनव साळुंखे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची रूपरेषा, प्रास्ताविक व स्वागत माजी विद्यार्थी संघटनेच्या समन्वयक प्रा. वर्षा धुळासावंत यांनी केले.
ग्रंथ प्रदर्शन
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) मध्ये जागतिक पुस्तक दिवस उत्साहात साजरा केला. संस्थेच्या ग्रंथालयात यानिमित्त भरवण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भेट दिली. संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तकांव्यतिरिक्त अन्य विविध प्रकारची पुस्तके विशेषतः विविध क्षेत्रातील महान व्यक्तींची आत्मचरित्रे आवर्जून वाचायला हवीत,’’ असे आवाहन केले. यशस्वी संस्थेच्या मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापिका मनीषा खोमणे, संस्थेचे ग्रंथपाल पवन शर्मा उपस्थित होते.
वार्षिक पारितोषिक वितरण
प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सहायक पोलिस आयुक्त (निवृत्त) भानुप्रताप बर्गे, सहायक मुख्य अधिकारी नीलकंठ पोमण, माजी आमदार विलास लांडे पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एम.जी. चासकर, क्वान्क्वेस्ट महाविद्यालय प्राचार्य प्रदीप कदम, विक्रांत लांडे पाटील, ॲड. संदीप कदम, ॲड. मोहनराव देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात धनश्री पाटील हिच्या योग प्रात्यक्षिकाने झाली. प्रियांका शहा (वनस्पतिशास्त्र) वैदही जोशी (इंग्रजी) काजल महाजन (भौतिकशास्त्र) नीलिमा पाठक (मराठी) हर्षदा कोंडे (वनस्पतिशास्त्र) सिंग रेणुका (इंग्रजी) जितेंद्रकुमार सुथार (अर्थशास्त्र) या सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.दीपक येवले व विद्यार्थी दीपक पवार यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. पी. एस. तांबडे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. बी. जी. लोबो, शारीरिक शिक्षण संचालक डॉ.ज्ञानेश्र्वर चिमटे, जिमखाना चेअरमन प्रा.एस. व्ही. पवार, प्रबंधक अनिल शिंदे यांनी केले.
तेलंग हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे यश
ताथवडे येथे डॉ. डी. वाय. पाटील हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने ‘कलिनरी चालेन्ज’ सीझन ३ रे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पुणे विभागातून १६ हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून ४२ टीम सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अरविंद ब तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, चिंचवड येथील विद्यार्थ्यांनी देखील भाग घेतला. त्यामध्ये प्रथम वर्षातील सोनार दिशा दीपक व प्रधान संम्युक्ता संजय यांनी ‘राजस्थानी थीम’ वर आधारित “खिमा चंद्रकला, लाल मास, खोबा रोटी आणि घेवर या पदार्थांचे कौशल्यपूर्ण सादरीकरण करत तृतीय क्रमांक पटकावला. यामध्ये इन्स्टिट्यूटमधील प्रॉडक्शन विभागाचे प्रा. दीपक मोरे, प्रा. शेखर खैरनार आणि प्रा. कल्पना जाधव यांचा मोलाचा वाटा असल्याचे प्राचार्य डॉ. अजयकुमार राय यांनी सांगितले. संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, मानद सचिव बी. व्ही. जवळेकर, प्राचार्य डॉ. अजयकुमार राय यांनी अभिनंदन केले.
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात व्याख्यान
आकुर्डी येथे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय वाणिज्य विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कंपनी सेक्रेटरी कसे व्हावे’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. या वेळी मार्गदर्शन करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाचे सदस्य कंपनी सचिव सोहल ठाकूर, विश्वनाथ कोटे, आर. यू. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, उपप्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, परीक्षा नियंत्रक प्रा. आर. बी. नागरे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. पद्मावती इंगोले, डॉ. रामदास लाड आदी उपस्थित होते. डॉ. रामदास लाड यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली. व्याख्यात्यानी कंपनी सचिव होण्यासाठी नोंदणी कशी करावी, त्याचे वेळापत्रक, फी, विषय, तसेच भविष्यातील नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी याबद्दलची सविस्तर माहिती दिली. व्याख्यानाचे आयोजन डॉ. रामदास लाड, प्रा. विकास जगताप, प्रा. ओंकार कवडे यांनी केले तर प्रा. सपना बिराजदार, प्रा. कोकीळ, प्रा. गौड, डॉ. संतोष वाढवणकर, प्रा. येरंडे, यांचे सहकार्य लाभले.
‘बाहा’ रेसिंग कार मेकिंग स्पर्धा
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स यांच्यावतीने मध्यप्रदेशमधील पिथमपूर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘बाहा रेसिंग कार मेकिंग स्पर्धेत’ आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीम प्रिडिएटर्स रेसिंग या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेतेपदासह विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या गाडीस स्पर्धेतील विविध १७ विभागातील बक्षिसे मिळाली. त्यापैकी ११ विभागात प्रथम क्रमांक मिळवून एक इतिहास रचला आहे. देशभरातील नामवंत १३८ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून आकुर्डीतील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपदासाठी इतर विभागातील ११ प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवली. या स्पर्धेत संघाचे व्यवस्थापन नील कापडी याने केले तर संघाचे नेतृत्व व चालकाची भूमिका विपुल जाधव याने पार पाडली. टीम प्रिडिएटर्स या विजयी संघात उपकप्तान सुदीप चव्हाण, पृथ्वीराज शिंदे, अली अबू फरजाद, प्रतीक बिरादार, मृणाल दौंडकर, सौरभ शिनगारे, अनुज टेंबुगडे,आर्यन केशरवानी, विकासकुमार सिंग, यशोदीप पाटील, नीलेश भोपाळे, गौरी खर्चे, अबरार पटेल, प्रथमेश पवार, यश मालुसरे, मंदार माळी, शंतनू पाटील व स्वराली गुलवाडे या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी. मालती, उपप्राचार्य डॉ. संदीप सरनोबत, तांत्रिक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार जत्ती, टीम प्रिडिएटर्स रेसिंग संघाचे शिक्षक समन्वयक वैभव फुले यांचे या यशासाठी सहकार्य लाभले. आकुर्डी येथील डी वाय पाटील संकुलाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री सतेज पाटील, डॉ. डी वाय पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील, डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलनाचे संचालक डॉ नीरज व्यवहारे यांनी यशस्वी संघाचे अभिनंदन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57930 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..