
मेलआयडी हॅक करून कंपनीच्या ग्राहकांना केले बदनामीकारक मॅसेज
पिंपरी - कंपनीचा ई-मेल आयडी (Company E-Mail ID) हॅक (Hack) करून ग्राहकांना कंपनीची बदनामी (Defamatory) करणारा मजकूर (Message) पाठविला. तसेच कंपनीतील व कंपनी सोडून गेलेल्या तब्बल एक हजार १५० कामगारांचा मृत्यू झाला असून ते पीएफ अकाऊंटमधून बाहेर पडत आहेत, अशी चुकीची माहिती दिली.
कुमार भरत लोमटे (वय ३४, रा. रॉयल पार्क , आळंदी रोड, वडमुखवाडी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी लोमटे यांची एसआयएस फॅसिलिटी इंडिया व श्रीविनायक इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या दोन्ही कंपनीचा ई-मेल आयडी आरोपीने हॅक केला. त्यानंतर लोमटे यांच्या कंपनीशी संबंधित असलेल्या ग्राहकांना कंपनीची बदनामी करणारा मजकूर पाठविला. तसेच पीएफ साईटवर जाऊन एसआयएस फॅसिलिटी इंडिया व श्रीविनायक इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस कंपनीतील कामगार व कंपनी सोडून गेलेले तब्बल एक हजार १५० कामगार यांचा मृत्यू झाला असून ते पीएफ अकाऊंटमधून बाहेर पडत असल्याबाबत चुकीची माहिती दर्शवली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c58082 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..