
माळी समाजाचा शनिवारी अरणला मेळावा
माळी समाजाचा शनिवारी अरणला मेळावा
पुणे, ता. २८ ः सावता परिषदेच्या वतीने संत शिरोमणी सावतामहाराज माळी यांची कर्मभूमी श्रीक्षेत्र अरण (ता. माढा)च्या विकासासाठी व राज्यातील माळी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शनिवारी (ता. ३०) श्रीक्षेत्र अरण, ता. माढा, जिल्हा सोलापूर येथे माळी समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री, धनंजय मुंडे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे आदींसह आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. मेळावा यशस्वी होण्यासाठी समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन
सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, पुणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील कोद्रे, पुणे महानगर संपर्क प्रमुख प्रज्वल राऊत, पुणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख अनुज गायकवाड यांनी केले आहे.
-------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c58092 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..