पिंपरीत आजपासून श्री काळभैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत आजपासून श्री काळभैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
पिंपरीत आजपासून श्री काळभैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

पिंपरीत आजपासून श्री काळभैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : पिंपरी वाघेरे गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज सार्वजनिक उत्सवानिमित्त उद्या (बुधवार) व गुरुवारी पिंपरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महापूजा, पालखी नगरप्रदक्षिणा, मिरवणूक, छबिना यासह कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. उत्सव समितीचे संयोजक, अध्यक्ष दत्तात्रेय वाघेरे यांनी ही माहिती दिली.

बुधवारी (ता. ४) पहाटे काळभैरवनाथ महाराजांची महापूजा, अभिषेक व विठ्ठल रुक्मिणीची काकड आरती होईल. रात्री नऊ वाजता पालखीची नगर प्रदक्षिणा मिरवणूक व छबिना होणार आहे. तसेच गुरुवारी (ता. ५) दुपारी चार वाजता पिंपरी वाघेरे ग्रामस्थांच्या वतीने नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या पटांगणात राज्यातील नामवंत पैलवानांच्या ५६ निकाली कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. या कुस्त्यांमध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व दिल्लीचे हिंदकेसरी नवीन कुमार यांच्यात निकाली कुस्ती होईल. या कुस्तीस दोन लाख रुपये व चांदीची गदा देण्यात येणार आहे. तसेच २०१९ चे महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर व उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे यांचीही निकाली कुस्ती होणार असून या कुस्तीसही दोन लाख रुपये व चांदीची गदा बक्षीस आहे. इतरही ५२ निकाली कुस्त्या व दोन निकाली कुस्त्या महिला गटातील होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c58846 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top