नदीत टाकलेला राडारोडा उचला गोडुंबे ग्रामस्थांची मागणी; पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नदीत टाकलेला राडारोडा उचला

गोडुंबे ग्रामस्थांची मागणी; पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची शक्यता
नदीत टाकलेला राडारोडा उचला गोडुंबे ग्रामस्थांची मागणी; पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची शक्यता

नदीत टाकलेला राडारोडा उचला गोडुंबे ग्रामस्थांची मागणी; पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची शक्यता

sakal_logo
By

सोमाटणे, ता. ३ ः गोडुंब्रे येथील बंधाऱ्याचे काम करताना नदीत टाकलेला राडारोडा उचलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात गोडुंब्रे गावात पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे.

१९७५ मध्ये पवना धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या वतीने शेतीच्या पाण्यासाठी गोडुंब्रेसह सहा गावाच्या परिसरात बंधारे बांधण्यात आली होती. यातील गोडुंब्रे येथील बंधाऱ्याचे ढापे बसवण्यासाठीचे आधारस्तंभ तुटल्याने पाणीगळती सुरू झाली होती. या पाणी गळतीमुळे बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता कमी झाल्याने शेतीच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. ही समस्या सोडवण्यासाठी बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी गोडुंब्रे ग्रामस्थांनी केली होती. या मागणीनुसार पाटबंधारे विभागाने तीन महिन्यापूर्वी बंधाऱ्याचे काम हाती घेतले होते. सध्या हे काम पूर्ण झाल्याने पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतीच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सुटला. परंतु, बंधाऱ्याचे काम करताना संबंधित ठेकेदारांनी नदीचे पाणी अडविण्यासाठी दगडगोटे, माती मुरम टाकला होता. बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यावर ठेकेदाराने नदीत टाकलेला राडारोडा तातडीने काढणे गरजेचे होते. परंतु, हा राडारोडा काढला नाही. त्यामुळे पावसात पुराचे पाणी अडले जाऊन नदीकाठी असलेल्या घरात पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे. हा धोका टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने तातडीने संबंधित ठेकेदारांकडून राडारोडा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

PNE22S61397

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59179 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top