देहूरोड परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूरोड परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी
देहूरोड परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी

देहूरोड परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी

sakal_logo
By

देहूरोड, ता. ३ ः शांतता आणि जातीय सलोख्यासाठी प्रार्थना करत, देहूरोड परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली. एकमेकांना आलिंगन आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या.
देहूरोड येथील ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. मौलाना हाफीज जाहिद यांनी नमाज पठण केले. सकाळपासून परिसरात अनेक मुस्लिम बांधव येथे दाखल झाले होते. लहान मुलेही मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. नमाज पठणानंतर सर्वांनी एकमेकांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नेते यदुनाथ डाखोरे, धर्मपाल तंतरपाळे, अॅड. कृष्णा दाभोळे, मिकी कोचर, अॅड. प्रवीण झेंडे, रेणू रेड्डी, अतुल मराठे, हिरामण साळुंखे, आशिष बंसल व विविध राजकीय पक्षाचे नेते यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
हूतील बाजारआळीतील जामा मश्जिदमध्ये सकाळी सामुदायिक नमाज पठण केले.

फोटोओळ ः देहूरोड ः रमजान ईदनिमित्त देहूरोड येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करताना मुस्लिम बांधव.
PNE22S61585

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59547 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top