
विद्येच्या प्रांगणात
विद्येच्या प्रांगणात
---
शाहिरी प्रशिक्षण, निरोप समारंभ आणि उत्साह
थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण मुलांच्या प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे शाहिरी प्रशिक्षण शिबिर झाले. महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष प्रकाश ढवळे व राजेंद्र आहेर यांनी आयोजन केले होते. शाहिरीचे प्रकार, वाद्ये, पोशाख याबद्दल माहिती दिली. गीत व पोवाडे गायनाचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले. उत्तम सादरीकरण करणाऱ्या बाल शाहिरांना ढवळे यांनी बक्षीसे देऊन प्रोत्साहित केले. पाचवी ते सातवीचे ९५ विद्यार्थी सहभागी झाले होते. नविन बाल शाहिरांनी गण, मुजरा, महाराष्ट्र गीत, शिव पराक्रम, पोवाडा आणि समता गीत असे विविध प्रकार शिकविले.
‘गोलांडे’त निरोप समारंभ
चिंचवडमधील श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयात सातवीच्या बॅचचा निरोप समारंभ झाला. मुख्याध्यापिका स्वाती जोशी यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. वर्गशिक्षिका विद्या नायडू यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मुलांनी शाळेसाठी सरस्वतीचा फोटो गिफ्ट दिला. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.
काळेवाडीत ध्वजवंदन
काळेवाडी येथील विद्यादीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आणि माने इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अक्षय माने यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शाळेतील अटल रोबोटिक टिंकरिक लॅबला उत्कृष्ट लॅब म्हणून गौरविण्यात आले.
----
शाळा पूर्वतयारी मेळावा
पुनावळे चिमुकल्यांचे औक्षण
पुनावळे कन्या शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा झाला. माजी नगरसेविका रेखा दर्शले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. चिमुकल्यांचे औक्षण केले. महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दर्शले आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. त्यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन उपक्रमाची माहिती घेतली. मुख्याध्यापिका विजया भोंडवे यांनी संयोजन केले.
चिंचवडला उत्साह
महापालिका प्राथमिक शाळा चिंचवड स्टेशन येथे ‘शाळा पूर्व तयारी’ मेळावा झाला. शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक राजेंद्र कांगुर्डे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. डॉ. विद्याधर फल्ले, आरोग्य निरीक्षक दत्तात्रेय गणगे, नथुराम मादगुडे उपस्थित होते. मुख्याध्यापिका अलका वाबळे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाची माहिती संगीता डोले यांनी दिली.
निगडीत प्रभात फेरी
महापालिकेच्या निगडी मुले-मुली क्रमांक २ प्राथमिक शाळेत ‘शाळा पूर्वतयारी’ मेळावा उत्साहात झाला. प्रभात फेरी काढून समाजप्रबोधन केले. मुलांसाठी सेल्फी पॉइंट तयार केले होते. आकुर्डी उन्नत केंद्राचे राजेंद्र मोहिते, स्टेरीया कंपनीच्या चैत्राली इनामदार, मुख्याध्यापक सुभाष चटणे, कल्पना तळेकर यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सुनील माने व पर्यवेक्षक सुनील लांघी यांनी संयोजन केले.
नेहरूनगरमध्ये मेळावा
महापालिकेच्या नेहरूनगर मुले क्रमांक एकमध्ये शाळापूर्व तयारी मेळावा घेतला. विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ घेतले. शिवशंकर उबाळे, महावीर नगराळे उपस्थित होते. मुख्याध्यापिका स्वाती निकम व वंदना केदार यांनी संयोजन केले. प्रतिभा चौधरी, सुजाता इंगवले, कल्पना काशीद, साधना आंबवणे, स्वाती खाटेकर, रश्मी दंडेलू, अनिता आब्दुले, अनिता थिटे यांनी मेहनत घेतली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59559 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..