
तळेगाव परिसरात रमजान ईद साजरी
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ३ : तळेगाव परिसरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिमबांधव उपस्थित होते. ईदची नमाज तळेगावतील ईदगाह मैदानावर अदा करण्यात आली. मौलाना सिकंदर ए आझम यांनी नमाज पठण केले. नमाज पठणानंतर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी ईदगाह मैदान येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जामा मशिदीचे विश्र्वस्त समीर नालबंद, व्यवस्थापक रशीद सिकीलकर, जामा मशिदीचे प्रमुख गनिमियाँ सिकीलकर, बाबूलाल नालबंद, अस्लम सिकीलकर, रुस्तुम नालबंद, मोबिन सिकीलकर, समीर मणियार, राजू सिकीलकर, अजीज सिकीलकर
आदी उपस्थित होते. ईदनिमित्त वरिष्ठ पोलिस निरिक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक प्रसाद गोकुळे, सहायक पोलिस निरिक्षक दुर्गानाथ साळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
PNE22S61594
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59561 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..