
चिंचवडमध्ये शुक्रवारपासून जिजाऊ व्याख्यानमाला
पिंपरी, ता.३ ः पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीअंतर्गत शुक्रवारपासून (ता. ६) ते मंगळवारपर्यंत (ता. १०) चिंचवड येथील गांधीपेठ तालीम मित्रमंडळातर्फे जिजाऊ व्याख्यानमालेचे विनाशुल्क आयोजन केले आहे. चापेकर चौकातील चापेकर स्मारकात दररोज सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्याने होतील.
शुक्रवारी (ता. ६) अर्थतज्ज्ञ अभय टिळक (आजचे अर्थचित्र : आव्हाने आणि उपाय), शनिवारी (ता. ७) ॲड. प्रवीण निकम (स्वप्नपूर्तीच्या राजमार्गाने जाताना युवकांसाठी आवश्यक महत्त्वपूर्ण कौशल्य व उच्च शिक्षणाची संधी), रविवारी (ता. ८) ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी (धर्म आणि राजकारण), सोमवारी (ता. ९) प्रा. प्रदीप कदम (छत्रपती शिवाजीमहाराज आणि आजचा समाज), मंगळवारी (ता. १०) कीर्तनकार वैशाली खोले (जननी ते जन्मभूमी) यांची व्याख्याने होतील. समारोप प्रसंगी चिंतामणी, क्रांतिवीर चापेकर आणि जिजाऊ पुरस्काराने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाईल, असे मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी कळविले आहे.
--
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59567 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..